Home / About US
भारतीय शेती व इस्रायलच्या शेती यामध्ये खुप मोठा फरक आहे इस्रायल शेतीचा अभ्यास मी जनार्दन दामोदर वाघेरे मु पो चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जि नाशिक येथे एका आदिवासी गावात याची सुरुवात २०१३ साली केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली व एक प्रमुख कारण लक्षात आले की पारंपरिक शेती मुळे येणारे उत्पन्न अती अल्प आहे व त्याच बरोबर फळबागांचे अंतर विद्यापीठांने जे ३० × ३० चे ठरवले आहे त्यामुळे गुंठ्यांत एक झाड बसते म्हणजे एका एकरात ४० झाडे व या ४० झाडांचे ३ टन उत्पन्न घ्यायचे असेल तर २० ते २५ वर्ष लागतात त्यामुळे वेळ खुप लागतो व फारसे काही हातात येत नाही याचं बरोबर इस्रायल,जर्मनी ,साऊथ आफ्रिका येथे कमी क्षेत्राच जास्त उत्पादन येते .....मग जर हे देश करु शकतात मग भारतीय का मागे याचा विचार करायला सुरुवात केली अनेक शेतकऱ्यांना भेटला या आनेक देशांच्या लागवडी बद्दल चर्चा केली परंतु कोणीही तयार झाले नाही शेवटी मीच माझ्या शेतात २०१३ साली 3×७ , फुटावर एकरी २१०० झाडे ,३×१० फुटावर १५०० झाडे ,३×१२ फुटावर १२२५ झाडे ,३× १४ फुटावर १००० झाडे असे अनेक प्रयोग केले सुरवातीला लोकांनी विरोध केला पण जेव्हा तीनच वर्षांत ३ ते ४ टन एकरी उत्पादन यायला सुरुवात झाली तेव्हा लोकांना आचर्याचा धक्का बसला आत्ता तुम्हाला वाटेल याचा आणि शेतकरी आत्महतेचा काय संबंध तर मित्रांनो संबंध आहे केशर आंबा फळबाग या दरवर्षी उत्पादन देत आहेत व टनेज मध्ये दरवर्षी वाढ होत आहे एखाद्या वर्षी जरी आसमानी संकटाने नुकसान झाले तरी झाड मात्र जीवंत असतात मी शेतकऱ्यांना आंबा उत्पादना बरोबर कलम कसे करावे याचे प्रशिक्षण देतो व शासनाची मान्यता घेऊन नर्सरी उद्योगात उतरवत आहे त्यामुळे एखाद्या वर्षी उत्पादन गेले तरी त्याला नर्सरी उद्योगातुन पैसे मिळतील व त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार येणार नाही असे मला वाटते त्याच बरोबर अल्प फी घेऊन इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती चे प्रशिक्षण वर्ग कसे घ्यावेत यांचे मार्गदर्शन करत आहोत मी दरवर्षी आमच्या बागेतील केशर नामधारी कंपनी मार्फत जपानला एक्सपोर्ट करतो दरवर्षी एकरी ४ ते ५ लाख रुपये कमावतो खर्च वजा जाता ३ते ४ लाख निव्वळ नफा शिल्लक राहतो तर मग महाराष्ट्रातील शेतकरयांना यांचा फायदा का होऊ नये म्हणुन हे तंत्रज्ञान मी देशभरातील शेतकरयांना मार्गदर्शन करत आहे यापुढे शेतकर्याचा माल प्रोसिसीग करुन जगभरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत आत्ता पर्यंत अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला व फायदा होत आहे
त्याच बरोबर अनेक फळबागांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती केली त्यामध्ये अनेक फळाच्या जातींची लागवड केली उदा.आब्याच्या २५ जाती ,पेरुच्या १२ जाती ,चिकुच्या २ जाती ,फनसाच्या तीन जाती ,काजुच्या २ जाती , सिताफळाच्या १२ जाती ,लिंबुच्या ५ जाती ,गोडचिच ,अंजीर असे एक अभ्यास केंद्र तयार केले व त्याला नाव दिले छत्रपती शिवाजी महाराज फळबाग अभ्यास केंद्र याच बरोबर शेतकऱ्यांना प्रात्येक्षिक ट्रेनिंग नंतर शेतीच्या पद्धती शिकविण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फळबाग अभ्यास केंद्राची निर्मिती केली. आज मी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहे ..
आत्ता पर्यंत किमान ५० हजार शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत व लाखो झाडांची लागवड होत आहे शेतकऱ्यांचा फायदा होत आहेच पण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न होत आहे
© 2024 Sundar Damodar Krushi Paryantan. All rights reserved | Developed by EverSofttech